'मिग-21' लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

'मिग-21' लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

धरमशाला : भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान 'मिग-21' आज (बुधवार) हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्यात कोसळले. या विमान अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाने न्यायालयाला या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

हवाई दलाच्या मिग-21 या विमानाने पठाणकोट हवाईतळावरून दुपारी 12.20 च्या सुमारास उड्डाण केले होते. त्यानंतर काही मिनिटांतच दुपारी 1.20 च्या सुमारास हे विमान पट्टा जट्टियन गावातील धरमशालापासून 70 किमी जवळ असलेल्या जवाली ठिकाणी कोसळले. या विमान अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाली नसून, हे विमान जवाली गावातील शेती जमिनीत कोसळले, अशी माहिती कांग्राचे पोलिस अधीक्षक संतोष पटियाळ यांनी दिली. हे विमान नियंत्रकाला दिसले नसल्याने ते बेपत्ता झाल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, या विमान अपघातानंतर भारतीय हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले असून, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com