पिंपळे सौदागरच्या भाजीमंडईतील गाळेवाटप करा ; स्थानिकांची मागणी

मिलिंद संधान
बुधवार, 20 जून 2018

लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेली ही मंडई वापराविना पडून राहिली असून ती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाच्या उदासिनतेवर आपला संताप व्यक्त करीत जाहीर नाराजी व्यक्त केली.

नवी सांगवी : पिंपळे सौदागर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाजी मंडईतील गाळेवाटप करुन ती चालू करण्याची मागणी येथील स्थानिकांनी केली आहे. 

लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेली ही मंडई वापराविना पडून राहिली असून ती उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाच्या उदासिनतेवर आपला संताप व्यक्त करीत जाहीर नाराजी व्यक्त केली.

साहजिकच भाजी मंडईसाठी लोकांकडून कर रुपाने गोळा केलेल्या पैशातून उभी राहिलेल्या या भाजीमंडईचा उपयोग नक्की होणार तरी कधी ? असा सवाल राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांनी  महापालिका आयुक्तांंना एका पत्राद्वारे केला आहे. 

नाना काटे म्हणाले, "सौदागर येथील लोकांना भाजीपाला खरेदीसाठी पिंपरीतील भाजी मंडईची वाट धरावी लागते अथवा आठवडे बाजाराची वाट पहावी लागते. यामुळे या भागात पथारीवाले व अनधिकृत हातगाडीवाल्यांची गर्दी झाली. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे येथील गाळे वाटप त्वरीत करुन हा प्रश्न निकालात काढावा."

Web Title: Pimpale Saudagar vegetable shops