नासाचे फोटो शेअर केल्याने पियुष गोयल 'ट्रोल'

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतातील सगळ्या गावांमध्ये वीज पोचल्याबद्दल मोदींचे कौतुक करत केंद्रिय मंत्री पुयूष गोयल यांनी Before आणि After असे लिहीलेले दोन फोटो ट्विट केले. मात्र हे दोनही फोटो जुनेच असल्याचे समोर आल्याने गोयल यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे.

काल(रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व गावांमध्ये वीज पोचल्याबद्दल देशवासियांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. 28 एप्रिल 2018 हा दिवस भारताच्या विकास यात्रेतील ऐतिहासिक दिवस म्हणुन लक्षात ठेवला जाईल असेही त्यांनी म्हटले होते.

त्यानंतर केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी मोदींचे कौतुक करत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोचली असल्याचे ट्विट केले. सोबत त्यांनी नासाचे जुने दोन फोटो ट्विट करत पुर्वी आणि आता अशी बदलेली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दोनही फोटो जुनेच असल्याचे ट्विटर युजर्सनी समोर आणले. या फोटोचा आणि देशातील सर्व गावांत वीज पोचल्यानंतरच्या परिस्थितीचा काहिही संबंध नाही.

पियुष गोयल यांनी ट्विट केलेले फोटो नासाने 2017 मध्ये प्रकाशित केले आहेत. यापैकी Before म्हणुन पोस्ट करण्यात आलेला फोटो 2012 या वर्षीचा आहे तर After म्हणुन पोस्ट करण्यात आलेला फोटो 2016 चा आहे.

Web Title: piyush goyal Hails 100% Electrification With NASA Pics