मिस्टर गांधी, तुमच्यासारखं बसून खायची मला सवय नाही : गोयल 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 मे 2018

नवी दिल्ली : 'मी मंत्रिपद स्वीकारण्यापूर्वी सनदी लेखापाल आणि इन्व्हेस्टमेंट बॅंकर होतो.. मिस्टर राहुल गांधी, तुमच्यासारखं काहीही न करता बसून खाण्याची मला सवय नाही', अशा तिखट शब्दांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज (मंगळवार) कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 'फ्लॅशनेट गैरव्यवहाराप्रकरणी गोयल यांनी राजीनामा द्यावा', अशी मागणी राहुल यांनी केली होती. 

काही तासांपूर्वी राहुल यांनी केलेल्या ट्‌विटरवरील टीकेनंतर गोयल यांनीही ट्‌विटरवरूनच उत्तर दिले आहे. '48 कोटी रुपयांच्या फ्लॅशनेट गैरव्यवहारात गुंतलेल्या गोयल यांनी राजीनामा दिला पाहिजे. प्रसिद्धीमाध्यमे या गैरव्यवहाराला प्रसिद्धी देणार नाहीत', अशी टीका राहुल यांनी केली होती. 

यावर गोयल यांनी दोन ट्विट करत प्रतिहल्ला केला. एका ट्विटमध्ये गोयल यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि गैरव्यवहाराचे आरोप झालेले त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर निशाणा साधला; तर दुसऱ्या ट्विटमध्ये राहुल गांधींना उत्तर दिले. 

Web Title: Piyush Goyal responds to allegations by Rahul Gandhi