चीनचा आणखी एक खोडसाळपणा उघड; आता...

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जुलै 2020

चीनकडून सैन्यांच्या संख्येत वाढ

- सॅटेलाईट फोटोच्या माध्यमातून होतंय उघड

नवी दिल्ली : चीन-भारत या दोन्ही देशांमध्ये सध्या संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे आता तेथील सीमारेषेवर मोठा तणाव आहे. पॅगोंग त्सो येथे चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली आहे. हा भाग आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार विविध कारवाया केल्या जात आहेत. त्यानंतर आता चीनच्या सैनिकांची नकाशेबाजी समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भीडले. या चकमकीमध्ये भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले. तर चीनच्या 43 सैनिकांना भारतीय लष्कराने ठार केलं. आता ज्या गलवान खोऱ्यात हे सर्व घडलं त्याचे सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. यातून चीन कशी कुरघोडी करत आहे हे दिसत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सॅटेलाईटच्या माध्यमातून याबाबतचे फोटोही घेतले जात आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या फोटोच्या माध्यमातून हे समोर आले आहे.  

Souce : NBT

जवळपास 8 किमीपर्यंतचा ताबा मिळवल्यानंतर ईशान्येकडील लडाखमध्ये पिपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ने आता पँगोंग तलावाच्या काठावर चीनचा नकाशा ठेवला आहे तसेच हा भाग आमच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. 

सॅटेलाईट फोटोच्या माध्यमातून होतंय उघड

सॅटेलाईटच्या माध्यमातून रोज नवं-नवे फोटो समोर येत आहेत. फिंगर 5 नंतर आता हे स्पष्ट होते की मोठ्या प्रमाणात इथं बांधकाम केले गेले. फिंगर 4 च्या किनाऱ्यावर चीनी बांधकामही दिसत आहे. 

चीनच्या तलावाजवळ बनविला बेस

प्लॅनेट लॅबचे फोटो आता समोर येत आहेत. चीनने फक्त तलावाच्या किनाऱ्यावर 8 किमी दूरवर असलेल्या रिजलाईनजवळ सुरक्षा पथक जमा केले आहे. यामध्ये टेंट, हट आणि अनेक शेल्टर दिसले आहेत. फिंगर 4 ते 8 या दरम्यान पोस्टस् सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटोही घेतले आहेत. 

Carved Maps

चीनकडून सैन्यांच्या संख्येत वाढ

पँगोंग त्सामध्ये चीनच्या हजेरीत छोटे-छोटे समूह वाढवले जात आहे. ओपन सोर्स इंटेलिजेन्स अनॅलिटिक्सनुसार, तलावाच्या 19 किमी दक्षिणेत चीनच्या सपोर्ट पोझिशन पाहिला मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PLA puts up signage china map on bank of ladakh lake to claim it as chinese land

टॅग्स
टॉपिकस