भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 20 मे 2018

गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा आमचा कट असल्याची कबुली अल्लारखा मन्सुरी या दहशतवाद्याने चौकशीदरम्यान दिली. महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्याला कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथून नुकतीच अटक केली आहे. 

अहमदाबाद - गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा आमचा कट असल्याची कबुली अल्लारखा मन्सुरी या दहशतवाद्याने चौकशीदरम्यान दिली. महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) त्याला कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथून नुकतीच अटक केली आहे. 

भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांवर मुंबईसारखा (26/11) हल्ला करण्याची आमची योजना होती. त्यासाठी आवश्‍यक असलेली स्फोटके पाकिस्तानमधील कराचीतून शारजा येथे आणण्यात आली आहेत. तेथून ती समुद्रामार्गे भारतात आणली जाणार होती, अशी माहितीही मन्सुरी याने दिली. हे हल्ले आगामी निवडणुकींदरम्यान होणार असल्याचा संशय "एटीएस'ने व्यक केला आहे. 

दरम्यान, एटीएसने मुंबईतून फैजल हसन मिर्झा या दहशतवाद्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याने चौकशीत मन्सुरीचे नाव उघड केले. त्यानंतर मन्सुरीही जाळ्यात आला असून, हे दोघे या कटात सहभागी असलेल्या अरब अमिरातमधील फारुख देवडीवाला याच्या संपर्कात होते. तसेच ते कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम व छोटा शकील याचे सहकारी असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. 
 

Web Title: planing of Terrorist attack in India