प्लाझ्मा थेरपीचा सरसकट वापर बेकायदा

प्लाझ्मा थेरपीचा सरसकट वापर बेकायदा

नवी दिल्ली -  प्लाझ्मा उपचार प्रणालीमुळे कोरोना हमखास बरा होतो हे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे या पद्धतीचा सरसकट वापर करणे बेकायदेशीर आहे, असे आरोग्य मंत्रालयाने काल स्पष्टपणे नमूद केले. दरम्यान, मागच्या सात दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांची संख्या ८० वर पोहोचली असून देशातील १४३ जिल्ह्यांमध्ये २८ दिवसांमध्ये नवा रुग्ण सापडलेला नाही, असे आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल सांगितले. 

देशातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला.  प्लाझ्मा उपचार पद्धतीबाबत सध्या वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी बरे झालेल्यांचा प्लाझ्मा हा अतिशय उपयुक्त ठरतो, असे यात मांडण्यात येते आहे. दिल्लीमध्ये तिचा उपयोग झाल्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही उपचारपद्धती अतिशय चांगली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रुग्णांना प्लाझ्मा देण्याबाबतची वेगवेगळी आवाहनेही आली होती. मात्र याबाबतच्या कोणत्याही प्रयत्नांना सरकारची परवानगी अजून देण्यात आलेली नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी याबाबतच्या प्रश्नावर ही उपचारपद्धती अजून मान्यताप्राप्त नाही, असे स्पष्टपणे सांगितले. यावर ‘आयसीएमआर’तर्फे चाचण्या आणि संशोधन सुरू असल्याचे ते म्हणाले. प्लाझ्मा पद्धती सिद्ध झाल्याशिवाय कोणीही सरसकट तिचा वापर करू नये, तसे केल्यास ते धोकादायक आणि बेकायदा ठरेल, असाही इशारा त्यांनी दिला. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २९ हजारांच्यावर पोहोचली असून ६८६८ रुग्ण बरे झाले आहेत. हे प्रमाण  २३.३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

डॉ. हर्षवर्धन यांनी काल दिल्लीचे नायब राज्यपाल, आरोग्यमंत्री तसेच प्रमुख रुग्णालयांमधील डॉक्टरांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मागच्या सात दिवसांमध्ये देशातल्या ८० जिल्ह्यांमधून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. १४ दिवसांमध्ये ४७ जिल्ह्यांमधून नव्या रुग्णाची नोंद नाही. ३९ जिल्ह्यांमध्ये मागच्या २१ दिवसांमध्ये, तर १७ जिल्ह्यांमध्ये २८ दिवसांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही देशात वाढत असून मागच्या १४ दिवसांमध्ये ८.७ टक्के आणि गेल्या आठवडाभरात १०.२ दिवस इतका रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com