प्लीज, मला सोडून जाऊ नकोस...

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

बंगळूर: प्लीज, मला सोडून जाऊ नकोस, हे वाक्य 40 पानांवर 40 वेळा लिहून एका अभियंता असलेल्या युवतीने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. युवतीच्या मृतदेहाशेजारी आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, तिने 40 पानांवर 40 वेळा 'प्लीज, मला सोडून जाऊ नकोस' एवढे एकच वाक्य लिहीले आहे. दक्षिण बंगळूर परिसरात आत्महत्येचा प्रकार घडला आहे.

आत्महत्या करणारी युवती अभियंता असलेल्या के. मनीष कुमार याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. युवतीसोबत राहणाऱया मनीष कुमारने आठवड्यापूर्वीच घर सोडले होते. पोलिसांनी आत्महत्येची गुन्हा दाखल करून तिच्यासोबत राहणाऱ्या युवकाचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या युवतीच्या सोबत राहणाऱ्या तरुणाने आठवडाभरापूर्वीच घर सोडले होते. त्यामुळे त्या युवकावर हत्येचा संशय घेता येणार नाही. दोघे ज्या घरात रहात होते, त्या घराच्या मालकाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. मात्र, त्यांच्याकडे अधिक माहिती मिळू शकली नाही. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव सुषमा बी. असून, ती बेल्लारी येथीर रहिवासी होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मनीष तिला सोडून गेल्यानंतर मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची शक्यता आहे.'

दरम्यान, युवतीच्या वडिलांनी मनीष विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: please dont leave me girl wrote 40 times 40-page suicide note at banglore