मल्ल्या म्हणतो; "पैसे घ्या पण...''

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी क्रिश्चियन मिशेलला भारत सरकारने ताब्यात घेण्याला आणि बँकांचे पैसे माघारी देण्यास मी दाखविलेली तयारी याचा काहीही संबंध नाही असा खुलासा मद्यसम्राट आणि बँकांचे 9 हजार कोटी रुपये घेऊन युकेला फरार झालेल्या विजय मल्ल्याने केला आहे. विजय मल्ल्याने बुधवारी ट्विटकरून आपण बँकांचे पैसे देण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतर भारतीय मीडिया आणि ट्विटवर मल्ल्या मिशेलवर झालेल्या कारवाईनंतर घाबरला असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर विजय मल्ल्याने ट्विट करून हा खुलासा केला आहे. 

मिशेलच्या ताब्यात घेण्याचा काहीही संबंध नाही. मी बँकांची 100 टक्के मुद्दल द्यायला तयार आहे. फक्त मला डिफॉल्टर म्हणू नका. तसेच, भारतीय नेते आणि माध्यमे माझ्याबाबतीत पक्षपात करत आहेत असे देखील मल्ल्याने म्हटले आहे. मी याअगोदरच कर्नाटक उच्च न्यायालयात बँकांच्या पैसे माघारी करण्यासंदर्भातील योजना सादर केली आहे. मात्र, त्याकडे मीडिया लक्ष देत नसून मला चुकीच्या पद्धतीने दाखविले जात आहे असे म्हणत मल्ल्याने आपली बाजू मांडली आहे. 

विशेष म्हणजे, मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली फरार असलेल्या मल्ल्यावर युके न्यायालयात खटला सुरु असून याच महिन्यात त्याचा निकाल येणार आहे. हा निकाल मल्ल्याच्या विरुद्ध जाण्याची शक्यता असल्याने मल्ल्याने आता आर्जव करत पैसे माघारी देण्याची तयारी दर्शविली आहे. 

Web Title: Please take it: Vijay Mallya offers to repay 100pct of debt