लोकशाहीसाठी सुवर्णदिन; पंतप्रधानांसह भाजपनेत्यांकडून स्वागत

लोकशाहीसाठी सुवर्णदिन; पंतप्रधानांसह भाजपनेत्यांकडून स्वागत

नवी दिल्ली : तीनदा तलाक सारख्या अनिष्ट प्रथेमुळे विलक्षण हाल सोसणाऱ्या मुस्लिम माता भगिनींसाठी दिवस ऐतिहासिक आहे कारण या प्रथेपासून त्यांची आता कायद्याने सुटका होणार आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.

सरकार साठी गेली पाच वर्षे अतिशय क्लिष्ट ठरलेल्या राज्यसभेत विधेयके मंजूर करण्याचा संख्याबळाचा अडथळा न आल्याचा आनंद वर्तुळात सर्वत्र दिसत होता. तीनदा तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि वरिष्ठ मंत्र्यांनी या ऐतिहासिक हा शब्द समान होता !!

विधेयक मंजूर झाले तरी त्या पेक्षा भयंकर असणाऱ्या हलाला सारख्या मुस्लिम समाजातील कुप्रथांचे वर सरकार कोणते पाऊल उचलणार हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र राज्यसभेचा अडथळा पार केल्याचा सलग दुसरा क्षण सत्तारूड पक्षाने आनंदाने साजरा केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधेयक मंजूर झाल्यानंतर सांगितले की ज्यांनी तीन तलाकमुळे निष्कारण हाल सोसले मुलांच्या धाडसाला मी सलाम करतो. तीन तलाक पद्धती हद्दपार झाल्याने महिला सशक्तिकरणाला मोठे बळ मिळेल ज्या पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला.... प्रत्याप्रयक्ष समर्थन दिले, यांचेही मी आभार मानतो इतिहासात या पक्षांचीही नोंद होईल.

अमित शहा आजचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी महान दिवस ठरला तीन तलाख सारख्या अनिष्ट प्रथेवर बंदी आणण्याचा शब्द पाळल्याबद्दल त्यांचे अभिनंदन मुस्लिम माता-भगिनींच्या ठरवा थांबेल. राज्यसभेत ज्यांनी याला पाठिंबा दिला त्या पक्षांचेही मी अभिनंदन करतो.

नितीन गडकरी- आजचा दिवस ऐतिहासिक आहे तीनदा तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यामुळे मुस्लिम पीडित महिलांना संसदेने खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.

रविशंकर प्रसाद- मान्यतेचे वर्तुळ पूर्ण होणे एवढ्यापुरता तीनदा तलाक मंजुरीचा विषय मर्यादित नाही. हजारो मुस्लिम माता-भगिनी तीनदा तलाक सारख्या खूप रते भयंकर जगणे जगत होत्या. किमान 20 मुस्लिम देशांनी यावर तीनदा तलाक वर बंदी आणली होती. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताने हा अन्याय दूर केला ही ऐतिहासिक गोष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com