पंतप्रधानांची पुन्हा ‘कोरोना पे चर्चा’

Narendra-Modi
Narendra-Modi

नवी दिल्ली - देशभरातील कोरोनाच्या संसर्गाचा वाढता आलेख कायम असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ व १७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही मुख्यमंत्र्यांशी मोदी ता. १७ रोजी (बुधवारी) चर्चा करतील. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यामध्ये सर्वाधिक बाधित राज्यांसाठी वेगळी नियमावली व उपाययोजना, दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांतील सार्वजनिक वाहतूक, राज्यांकडून सातत्याने होणारी आर्थिक मदतीची मागणी, वेगळ्या रंगरूपातील संभाव्य फेरलॉकडाऊनच्या शक्‍यता तपासणे आदी पाच ते सहा ठळक मुद्यांचा यात समावेश असेल. यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करू शकतात. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ लाख १२ हजार ७५९ तर मृतांची संख्या ८ हजार ९२८ एवढी झाली आहे. 

हे शक्य...

  • केंद्र राज्यांकडून अहवाल मागविणार
  • राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नव्या सूचना
  • आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींबाबत मोदींकडून सूचना
  • मुख्यमंत्र्यांकडून नव्या सूचना येतील
  • बाधित राज्यांसाठी वेगळी योजना
  • ग्रामीण, कृषी अर्थव्यवस्थेबाबत नव्या उपायांवर चर्चा
  • लोकांच्या मुक्त वावरावर काही निर्बंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com