मोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी भारतीय सुरक्षा दलांविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे', असे टीकास्त्र गांधी यांनी सोडले. 

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांनी राफेल करारातील संशयास्पद व्यवहारांवरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. 'पंतप्रधान मोदी आणि अंबानी यांनी मिळून 130 हजार कोटी रुपयांचा 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. मोदीजी, तुम्ही हुतात्मा जवानांच्या बलिदानाचा अपमान केला आहे. लाज वाटायला हवी! तुम्ही भारताचा अपमान केला आहे', अशी खरमरीत टीका गांधी यांनी केली.

'पंतप्रधान मोदी यांनी स्वत: बंद दरवाजाआड चर्चा करून राफेल कराराला अंतिम स्वरूप दिले. दिवाळखोरीत चाललेल्या अनिल अंबानी यांना कोट्यवधी डॉलरचे कंत्राट त्यांनी मिळवून दिले. पंतप्रधानांनी देशाला धोका दिला आहे', असा आरोप गांधी यांनी काल केला होता. 

'राफेल करारामध्ये भारतीय कंपनीची निवड भारत सरकारनेच केली', असा दावा फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद यांनी केल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आहे. ओलॉंद यांच्या दाव्यानंतर भारत सरकारनेही तातडीने पत्रक काढून खुलासा केला. 'भारत किंवा फ्रान्स सरकारचा या व्यवहारातील निर्णयांवर कोणताही हस्तक्षेप नव्हता', असे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com