PM किसानचा हफ्ता १ जानेवारीला होणार जमा

दहाव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला होणार आहे.
PM kisan
PM kisanSakal

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देण्याच्या ‘पीएम किसान निधी योजने’च्या (PM Kisan Fund) दहाव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला होणार आहे. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवादही साधतील. दरम्यान, ३५१ कृषी उत्पादक संस्थांना (FPO) १४ कोटी रुपयांचा निधी देखील या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात येईल. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

वादग्रस्त तीन कृषी कायदे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा तांत्रिकदृष्ट्या पहिला शेतकरी संवाद असेल. यानिमित्ताने केंद्र सरकारच्या कृषी सुधारणांसाठीच्या योजनांची उजळणी पंतप्रधानाद्वारे केली जाऊ शकते. यावेळी सुमारे १० कोटीच्यावर लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यामध्ये वीस हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा होणार आहे. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये या समान हप्त्यात दिले जाते. आतापर्यंत पीएम-किसान योजनेंतर्गत ११.६० कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला असून १.६ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित झाली आहे.

PM kisan
बेळगाव, निपाणीत एसीबीचे छापे; कार्यालयात कागदपत्रांची झडती

रक्कम हस्तांतरातील अडचणीत दुरुस्ती

पीएम किसान योजनेमध्ये रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होत असली तरी बऱ्याचदा काही खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरात अडचणीही आल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये त्रुटी दूर करून पुन्हा रक्कम बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे.

कृषी मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, योजनेंतर्गत ८० कोटी २७ लाख ४४ हजार ६७४ व्यवहार झाले असून १ टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच ६९,०००५८ प्रकरणांमध्ये रक्कम हस्तांतरात अडचणी आल्या. त्यानंतर ३१,८६,९२१ प्रकरणात दुरुस्ती करून पुन्हा रक्कम जमा करण्यात आली. महाराष्ट्रात ११,९८,५४३ प्रकरणात अडचणी आल्या होत्या. त्यानंतर ७,५२,२९५ प्रकरणांमध्ये सुधारणा करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com