पंतप्रधान मोदी 29 ला करणार 'परीक्षा पे चर्चा'

पीटीआय
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नवी दिल्ली : बोर्डाच्या परीक्षेला तोंड देणारे विद्यार्थी व त्यांच्या पालक-शिक्षकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 जानेवारीला दिल्लीत "परीक्षा पे चर्चा' करणार आहेत. निवडक मुलांच्या प्रश्‍नांना ते उत्तरेही देणार असून, त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे इच्छुक हजारो विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांचा पाऊस पडला आहे. यंदाच्या कार्यक्रमात काही अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांनाही (एनआरआय) आवतण देण्यात आले आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून मोदी परीक्षेच्या काळात "मन की बात' माध्यमातून विद्यार्थ्यांना तणावरहित परीक्षेबाबत टिप्स देत आहेत. त्यातून गतवर्षी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांबरोबर "परीक्षा पे चर्चा' करावी, अशी कल्पना पुढे आली. यंदाचा कार्यक्रम हा त्याचा विस्तार असेल. तालकटोरा मैदानावर होणाऱ्या यंदाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा निवडक विद्यार्थ्यांबरोबरच पालक व शिक्षकांनाही यात सहभागी करून घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताणतणाव वाढविण्यास हे दोन्ही घटक तेवढेच जबाबदार असल्याचे विविध अभ्यासांतून समोर आल्याने या दोघांशीही पंतप्रधानांनी संवाद साधण्याचे ठरविल्याचे समजते. 

केंद्राने गतवर्षीपासून 12 वी बरोबरच 10 वीच्या परीक्षाही बोर्डाच्या परीक्षा केल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची ही दुसरी फळी असेल. मोदींनी तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर भागातील बूथप्रमुखांशी बोलताना याचे सूतोवाच केले होते. प्रवासी भारतीयदिनी त्यांनी काल वाराणसीत बोलताना एनआरआय विद्यार्थ्यांनाही याचे आमंत्रण दिले.

"नमो ऍप'च्या माध्यमातून इच्छुक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. बोर्डाच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी व त्यांच्यावरील ताणतणाव हा मोदींच्या दृष्टीने कायम काळजीचा विषय असल्याचे दिसून आले असून "तणावरहित परीक्षा' या विषयावर ते विद्यार्थ्यांना कायम मार्गदर्शन करत असतात. "एक्‍झाम वॉरियर्स' नावाचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे व ते साऱ्या भारतीय भाषांत प्रकाशित झाले आहे. 

Web Title: PM to launch in 29 Pariksha Pe Charcha