अखेर मोदींनी राफेल करारावर सोडले मौन

वृत्तसंस्था
रविवार, 16 डिसेंबर 2018

संरक्षणाच्या बाबतीत काँग्रेसचा इतिहास बोफर्स गैरव्यवहारातील क्वात्रोचीशी संबंधित राहिलेला आहे. हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील ख्रिश्चियन मिशेलला भारतात आणण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस राफेल करारावर खोटे बोलून नागरिकांना भडकावत आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच राफेल करारावर मौन सोडले.

रायबरेली : संरक्षणाच्या बाबतीत काँग्रेसचा इतिहास बोफर्स गैरव्यवहारातील क्वात्रोचीशी संबंधित राहिलेला आहे. हेलिकॉप्टर गैरव्यवहारातील ख्रिश्चियन मिशेलला भारतात आणण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस राफेल करारावर खोटे बोलून नागरिकांना भडकावत आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच राफेल करारावर मौन सोडले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, राफेल करारात क्वात्रोची मामा किंवा मिशेल हे अंकल नाहीत, त्यामुळे आता ते न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवत आहेत. राफेल कराराच्या मुद्याचे काँग्रेस जाणीवपूर्वक भांडवल करत आहे. देशाला माहित आहे की काँग्रसे कोणासोबत आहे. काँग्रेस आपल्या लष्करांना कणखर होऊ देत नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी भाषण केले की, पाकिस्तानात टाळ्या वाजतात, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 2019 च्या निवडणूकीच्या रणसंग्रामाला सुरवात करण्याची शक्यता आहे. रायबरेलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकास कामांचा शुभारंभ करून जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेससह विरोधकांवर हल्लाबोल केला.

मध्य प्रदेश, राजस्थानसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीच रॅली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा रायबरेलीमध्ये आले आहेत. येथे अनेक विकास कामाचे लोकार्पण केले. जनतेला संबोधित करण्यापूर्वी मोदी यांनी हमसफर कोचला हिरवा झेंडा दाखवला.

Web Title: PM Modi Addresses Rally In Raebareli