...म्हणून काँग्रेस नेत्यांना घ्यावा लागतो खोट्याचा आधार: मोदी

Narendra Modi, Vasundhara Raje, Rajasthan, Madhya Pradesh
Narendra Modi, Vasundhara Raje, Rajasthan, Madhya Pradesh

अजमेर- काँग्रेस नेत्यांचा अभ्यास कमी आहे, म्हणून त्यांना सातत्याने खोट्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. काँग्रेस 60 वर्षात अपयशी ठरले आहे पण ते या चार वर्षात विरोधी पक्ष म्हणूनही फेल ठरले असल्याचे मत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेचा समारोपावेळी अजमेर येथे बोलत होते.

मोदींनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. जेव्हा विकासाच्या मुद्याची चर्चा सुरु होते तेव्हा काँग्रेसचे नेत पळ काढतात असा आरोप मोदींनी केला आहे. काँग्रेस नेते फक्त एका कुटुंबाची आरती ओवाळण्यात धन्यता मानतात. जनता ही भाजपाची हायकमांड आहे तर काँग्रेसचे हायकमांड फक्त एक कुटुंब आहे. त्या कुटुंबाभोवीच काँग्रेस नेते प्रदक्षिणा घालतात असेही मोदी म्हणाले.

विरोधी पक्षात बसून काही बोलण्याचे स्वातंत्र्य असते. कारण तेव्हा कोणी विचारणारे नसल्याने प्रवास सोपा असतो असे मोदी म्हणाले. आमचे सरकार सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय उद्देशाने काम करत आहे. जे मतपेटीचे राजकारण करतात त्यांना हिंदू-मुस्लिम, जातीचा खेळ खेळण्यात मजा येते. कुठल्याही प्रदेशाचा कमी-जास्त विकास होता कामा नये सर्वांचा समान विकास झाला पाहिजे असे मोदी म्हणाले. मतपेटीचे राजकारण करणारे सत्तेत बसले तर सरकारी नोकरशाहीचा सोयीनुसार वापर सुरु होतो असे मोदी म्हणाले. काँग्रेसच्या मतपेटीच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मी आजही तोच नरेंद्र मोदी आहे जो स्कूटरवर बसून संघटनेचे काम करायचा असेही मोदी यांनी सांगितले. तसेच, त्यांनी यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंचे कौतुक केले. वसुंधरा राजेंनी 13 लाख कुटुंबांपर्यंत वीज पोहोचवली असल्याचा दावाही मोदींनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com