नेताजींच्या नावाने पुरस्कार; मोदींची घोषणा

PM Modi announces national award in Netajis name to recognise police personnel for disaster relief works
PM Modi announces national award in Netajis name to recognise police personnel for disaster relief works

नवी दिल्ली- राष्ट्रीय पोलिस दिनानिमित्त राष्ट्रीय पोलिस स्मारकाचे उद्घाटन आज (ता.21) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निमलष्करी दलाच्या जवानांच्या शौर्याची आठवण काढताना ते काही भावूकही झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातील (एनडीआरएफ) जवानांसाठी आता प्रत्येक वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा यावेळी मोदींनी केली आहे.

21 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत लडाख येथील हॉट स्प्रिंगमध्ये शहीद झालेल्या आपल्या निमलष्करी दलाच्या 10 जवानांच्या आठवणीसाठी पोलिस स्मारक दिवस पाळला जातो. यावेळी मोदी म्हणाले की, आजचा दिवस त्या साहसी पोलिस जवानांच्या वीरगाथेला स्मरण करण्याचा दिवस आहे, ज्या जवानांनी लडाखच्या बर्फाळ डोंगरांमध्ये पहिल्यांदा देशाच्या संरक्षणाचे काम करताना आपले बलिदान दिले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये कायदा आणि शांतता राखण्यासाठी आणि दहशतवादाविरोधात लढणाऱ्यांची आठवण ठेवणारा दिवस आहे. त्याचबरोबर नक्षलग्रस्त भागात आपल्या जवानांनी खूपच प्रभावशाली कामगिरी केली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या नक्षलग्रस्त भागातील नक्षली कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असून येथील तरुण मुख्य प्रवाहात सामील होत असल्याचे प्रतिपादन यावेळी मोदींनी केले.

तसेच, ज आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला आज 75 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमीत्त आज लाल किल्यावर स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच ध्वजारोहन करण्यात आले. देशाचे स्वांतत्र्य हा नेताजींचा एकच हेतू होता, हेच त्यांचे कार्यक्षेत्र होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त पहिल्यांदाच येथे ध्वजारोहनही केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com