परदेशात नोकरीसाठी प्रवासी कौशल्य विकास योजना

वृत्तसंस्था
रविवार, 8 जानेवारी 2017

बंगळूर- परदेशात रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीयांसाठी केंद्र सरकार लवकरच प्रवासी कौशल्य विकास योजना सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. 

बंगळूर- परदेशात रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीयांसाठी केंद्र सरकार लवकरच प्रवासी कौशल्य विकास योजना सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. 

बंगळूरमध्ये प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. 
प्रवासी कौशल्य विकास योजनेअंतर्गत परदेशात ठराविक क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे प्रशिक्षित आणि प्रमाणित करण्यात येईल. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने पररष्ट्र मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षकांच्या साह्याने ही योजना राबविण्यात येणार आहे. 

"तुमच्या सहकार्याने आम्ही ब्रेन ड्रेनचे रुपांतर ब्रेन गेनमध्ये करू," असे मोदी म्हणाले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांचे मोदी यांनी कौतुक केले. मोदी पुढे म्हणाले, "सर्व भारतीयांचे कल्याण आणि सुरक्षा याला आमच्या प्राधान्यक्रमात सर्वात वरचे स्थान आहे."
 

Web Title: PM Modi announces scheme to skill Indian youth seeking jobs abroad