ModiWithSakal : मोदी म्हणतात, 'सकाळ'सोबत साधला विस्तृत संवाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

- पवार-मोदी यांची मुलाखत वाचण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदींनीच ट्विटरवरून आवाहन केले आहे. 

नवी दिल्ली : 'सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. मराठी वृत्तपत्र क्षेत्रातील ही पहिलीच मुलाखत ठरली आहे. पवार-मोदी यांची मुलाखत वाचण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदींनीच ट्विटरवरून आवाहन केले आहे. 

अभिजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्याला मोदींनीही उत्तरे दिली. ही मुलाखत आज (ता.14) 'सकाळ'च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीचा सारांश देत पंतप्रधान मोदींनी केलेल्या या ट्विटमध्ये म्हटले, की '''सकाळ' या वृत्तपत्रासोबत विस्तृत संवाद साधला. यावेळी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका, महाराष्ट्र, आमच्या भविष्यातील योजना, आणि बऱ्याच इतर विषयांवर चर्चा झाली. जरूर वाचा''. 

 

मुलाखत वाचा :

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत) 

Web Title: PM Modi Appeal to read Their interview which is Published in Sakal Newspaper