पंतप्रधान मोदी 'चॅम्पियन ऑफ द अर्थ'

PM Modi Champion of the Earth
PM Modi Champion of the Earth

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावरील मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना जागतिक स्तरावरील हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल मिळाला आहे. पंतप्रधान मोदींसह फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनाही हा सन्मान मिळाला आहे.

संयुक्त राष्ट्राने (यूएन) पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगातील सहा व्यक्तींना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन या दोघांना संयुक्तरित्या हा सन्मान प्राप्त झाला आहे. 2022 पर्यंत भारताला एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्याचा संकल्प आणि आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे नेतृत्वामुळे मोदींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार जाहीर झाल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपच्या नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com