पंतप्रधान मोदींकडून ट्रम्प यांचे अभिनंदन !

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विजयाबद्दल ट्विटरवरून आज (बुधवार) अभिनंदन केले.

ट्विटरवरून मोदी म्हणाले, 'अमेरिकेचे 45वे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन. यापुढील काळात भारत-अमेरिका एकत्रित काम करून दोन्ही देशांमधील संबंधाची नवी उंची गाठतील. शिवाय, दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.'

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी ट्रम्प यांच्याबरोबर काम करण्याची तयारी असल्याचेही पुतीन यांनी म्हटले आहे.

Web Title: PM Modi congratulates Donald Trump