एका क्लिकवर मोदी सरकार देणार 25 हजार कोटी!

एका क्लिकवर मोदी सरकार देणार 25 हजार कोटी!

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरखपूर राष्ट्रीय किसान संमेलनाच्या निमित्ताने येथे उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी एका क्लिकवर देशातील 12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 हजार कोटी रुपये जमा करणार आहेत. या वर्षातील सर्वात मोठी घोषणा ठरणार आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी ही योजना मोदी सरकारकडून लागू केली जाणार असल्याने शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे. राष्ट्रीय किसान सन्मान निधी योजनेचा पहिला हफ्ता येत्या रविवारी दिला जाणार आहे. तसेच या योजनेवर केंद्र सरकारकडून 75 हजार कोटी रुपयांचा खर्च केले जाणार आहे. 

दरम्यान, किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपचे खासदार वीरेंद्र सिंह यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक अशी ठरणार असल्याचे सांगितले. 

शेतकऱ्यांसाठी ही पहिली योजना 

उत्तर प्रदेशातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी लागू केली जाणारी ही पहिलीच योजना आहे, असे उत्तर प्रदेशातील भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष राजा वर्मा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com