मोदी सत्तेसाठी देशात फूट पाडत आहेत : लालूप्रसाद यादव

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

लखनौ (उत्तर प्रदेश) - सत्तेत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जात, वंश, धर्म, रंगांवरून देशात फूट पाडत असल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) - सत्तेत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जात, वंश, धर्म, रंगांवरून देशात फूट पाडत असल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना लालूप्रसाद यादव म्हणाले, 'उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यापासून मोदी देशात फूट पाडत आहेत.' उत्तर प्रदेशमधील फतेहपूर येथे रविवारी एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, 'एखाद्या गावात जर रमजानदरम्यान वीजपुरवठा केला जात असेल, तर तेथे दिवाळीमध्येही वीजपुरवठा करायला हवा. धर्म आणि जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ नये.' या पार्श्‍वभूमीवर यादव यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

लालूपुत्राचीही मोदींवर टीका
मागील आठवड्यात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) भोपाळ येथे चालविण्यात येणाऱ्या टेलिफोन एक्‍स्चेंजवर छापा टाकला होता. या प्रकरणी एटीएसने अकरा जणांना ताब्यात घेतले होते. ही टोळी देशभरातून गुप्त माहिती घेऊन ती देशाबाहेर पाठवित होती. या टोळीतील ध्रुव सक्‍सेना नावाचा एक व्यक्ती भाजप युवा मोर्चाच्या आयटी विभागाशी संबंधित असल्याची बाब आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने समोर आणून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर 'भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे आयएसआयच्या एजंटांसोबत असलेल्या संबंधांबाबत 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांनी तोंड उघडावे. त्यांनी मौन सोडावे आणि बोलावे', अशी टीका लालूपुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केली आहे.

Web Title: PM Modi dividing nation for sake of retaining power : Lalu Yadav