आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी रवाना

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जुलै 2018

आफ्रिका खंडाबरोबर संबंध मजबूत करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. आपल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात ते रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत.
 

नवी दिल्ली : आफ्रिका खंडाबरोबर संबंध मजबूत करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. आपल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात ते रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेला जाणार आहेत.

अफ्रिकेबरोबर भारताचे असलेले ऐतिहासिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांचा हा दौरा उपयुक्त ठरणार असून, 23 ते 27 जुलैदरम्यान ते रवांडा, युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिली. 

पंतप्रधान मोदी यांचा रवांडा आणि युगांडाचा हा पहिलाच दौरा आहे. दक्षिण आफ्रिकेत 10 ब्रिक्‍स संमेलनात सहभागी होणार आहेत, असे ते म्हणाले. पंतप्रधानांची तीन देशांची ही यात्रा म्हणजे आफ्रिकेशी भारताची असलेली भागीदारी प्रतिबिंबित करणारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: PM Modi embarks on three nation tour to Africa