ManvsWild : पंतप्रधान मोदींची 'जंगल सफारी'; 'डिस्कव्हरी इंडिया'वरून होणार प्रदर्शित

Man vs Wild
Man vs Wild

नवी दिल्ली : चहा विक्रेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते व गुजरातचे तीन वेळा मुख्यमंत्री असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवास सर्वसामान्यांना माहीत आहे. पण आता लवकरच त्यांचा नवा व अनोखा पैलू दिसणार आहे. मात्र त्यासाठी 12 ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या दिवशी रात्री नऊ वाजता सादर होणाऱ्या डिस्कव्हरी वाहिनीच्या 'मॅन वर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमात मोदी हे वन्यजीवप्रेमीच्या रूपात दिसणार आहेत. 

आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनाचे निमित्त साधून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भारतातील वन्यजीव संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर आधारित एका खास कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रण केले आहे. या कार्यक्रमात मोदी हे जंगलात किंवा ओसाड प्रदेशात जगण्याची युक्ती जाणून घेताना आणि भारतातील विशाल व वैविध्यपूर्ण निसर्ग, त्याचे संवर्धनासाठीचे उपाय आणि भौगोलिक बदलांसंबंधी कसे काम केले जात आहे, याबद्दल ग्रिल्स यांच्याबरोबर चर्चा करताना दिसणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा चेहरा 180 देशांमधील नागरिकांना लवकरच दिसणार आहे, असे ट्‌विट ग्रिल्स यांनी केले आहे. या ट्विटसह ग्रिल्स यांनी #PMModionDiscovery हा हॅशटॅगही ट्विट केला आहे. 
'मॅन वर्सेस वाईल्ड'मध्ये मोदी हे साध्या कपड्यांमध्ये दिसणार असून ग्रिल्स यांच्यासह तेकधी छोट्या नावेतून नदी पार करताना तर कधी जंगलात ट्रेक करतानाही दिसणार आहे. शिकार आणि अन्य कामांसाठी ग्रिल्स या कार्यक्रमात जंगलात उपलब्ध साहित्यापासूनच उपकरणे तयार करीत असतात, याचीही एक झलक याच्या जाहिरातीत दिसत आहे.

'डिस्कव्हरी' वाहिनीवरील 'मॅन वर्सेस वाईल्ड' हा जगातील सर्वांत लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. यात जगभरातील अनेक नामवंत आणि प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावलेली आहे. हा कार्यक्रम अनेक भाषांमध्ये अनुवादित केला जातो. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनीही यात भाग घेतला होता. ओबामा आणि ग्रिल्स यांनी अलास्का पर्वतावर चढताना हा कार्यक्रम सादर केला होता. यात ओबामा यांनी तापमान वाढ, नैसर्गिक साधने आणि वन्यपशुपक्ष्यांबद्दल चर्चा केली होती. 

भारतातील संपन्न नैसर्गिक वारसा जगापुढे आणण्यासाठी आणि पर्यावरणाचे संवर्धनाचे महत्त्व व निसर्गाच्या संगतीत राहण्याचे महत्त्व स्पष्ट करण्याची 'मॅन वर्सेस वाईल्ड'द्वारे मला मोठी संधी मिळाली. मी अनेक वर्षे निसर्गात घालविली आहे. डोंगर, जंगलांमध्ये राहिलो आहे. या कार्यक्रमामुळे मला पुन्हा जंगलाचा अनुभव मिळाला. बेअर यांना अफाट ऊर्जेचे वरदान असून निसर्गाचे शुद्ध रुपाचा अनुभव घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

(सौजन्य : डिस्कव्हरी चॅनेल इंडिया)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com