मोदींचे राजकारण आत्मकेंद्रित: राजद

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

पाटना (बिहार) : राष्ट्रीय जनता दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत ते आत्मकेंद्रित राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा म्हणाले, "ते स्वत:च्या प्रेमात आहेत. ते अर्थतज्ज्ञांकडून येणारे सल्ल्यांकडे लक्ष देत नाहीत. ते आत्मकेंद्रित राजकारण करत आहेत. कोणताही अर्थतज्ज्ञ नोटाबंदीला पाठिंबा देत असल्याचे मला आढळलेले नाही. सध्या काळा पैसा धारकाला नव्हे तर गरीबांना आणि मध्यवर्गीय नागरिकांना त्रास होत आहे.' अशी टीका करत "हे बरोबर आहे काय? तुम्ही काय करत आहात?' असे प्रश्‍नही झा यांनी यावेळी उपस्थित केले.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आज त्यांच्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या मुद्यावर पक्षाच्या आगामी धोरणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित आमदार, खासदारांकडून त्यावर प्रतिक्रिया जाणून घेतल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मात्र नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

Web Title: PM Modi following 'politics of narcissim': RJD