स्वातंत्र्यदिन भाषणासाठी मोदींनी मागविल्या सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 जुलै 2019

15 ऑगस्टच्या भारतीय स्वातंत्र्य दिवसानिमित्त लाल किल्ल्यावरून आपण जे भाषण करू त्यासाठी जनतेने सूचना कराव्यात असे जाहीर आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. देशवासीयांनी "नमो ऍप' वर आपल्या प्रस्तावित भाषणासाठीच्या सूचना द्याव्यात असेही मोदींनी म्हटले आहे. 

नवी दिल्ली ः येत्या 15 ऑगस्टच्या भारतीय स्वातंत्र्य दिवसानिमित्त लाल किल्ल्यावरून आपण जे भाषण करू त्यासाठी जनतेने सूचना कराव्यात असे जाहीर आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. देशवासीयांनी "नमो ऍप' वर आपल्या प्रस्तावित भाषणासाठीच्या सूचना द्याव्यात असेही मोदींनी म्हटले आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडीला 352 जागांचे भरघोस मताधिक्‍य मिळाले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी आगामी 15 ऑगस्टला आपल्या सलग दुसऱ्या कार्यकाळातील पहिले भाषण देणार आहेत. यासाठी त्यांनी नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. हे त्यांचे लाल किल्ल्यावरील सहावे भाषण असेल. मोदी आपल्या "मन की बात" या आकाशवाणी कार्यक्रमासाठीही लोकांकडून सूचना मागवत असतात. आगामी भाषमासाठीही सूचनांबाबत त्यांनी आज ट्विट केले. त्यांनी म्हटले आहे की लाल किल्ल्याच्या सौधावरून 130 कोटी भारतीय आपलेच विचार एकणार आहेत. त्यासाठी नमो ऍपवर बनविलेल्या विशएष विभागाद्वारे तुमच्या सूचना कळवाव्यात. 

अहीर यांच्यावर नवी जबाबदारी 
लोकसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झालेले हंसराज अहीर व माजी मंत्री राधामोहनसिंह यांच्यासह चोघांची नियुक्ती पक्षाच्या आगामी संघटनात्मक निवडणुकांसाठी पक्षाचे विशेष निवडणूक अधिकारी म्हणून भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. जगातील सर्वांत मोठी सदस्यसंख्या असलेला पक्ष असा दावा भाजपतर्फे केला जातो.

संघटनात्मक निवडणुकांसाठी अधिकारी म्हणून अहीर व राधामोहन यांच्यासह दलित नेते विजय सोनकर शास्त्री व दक्षिणेतील सी टी रवी यांचीही नियुक्ती शहा यांनी केली आहे.भाजपच्या घटनेप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी देशातील सर्व राज्यांपैकी किमान पन्नास टक्के राज्यांच्या संघटनात्मक निवडणुका पार पाडाव्या लागतात. त्यानंतर त्या त्या प्रदेश सित्या राष्ट्रीय अध्यक्षांचे नाव ठरविल्यानुसार केंद्रीय कार्यालयाकडे कळवतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi invites suggestions for Independence Day speech 2019