'मोदी, ओवैसी आणि राव एकाच माळेचे मणी'

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेद्र मोदी, एमआयएमचे नेते ओवैसी आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे के चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली आहे. हे तिन्ही एकाच माळेचे मणी असल्याचा घणाघात त्यांनी केला. हे तिघे मिळून जनतेला वेडे बनवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेद्र मोदी, एमआयएमचे नेते ओवैसी आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे के चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली आहे. हे तिन्ही एकाच माळेचे मणी असल्याचा घणाघात त्यांनी केला. हे तिघे मिळून जनतेला वेडे बनवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष भारतीय जनता पक्षाची 'बी टीम' असल्याचा आरोपही राहुलनी यावेळी केला आहे. तर एमआयएम हा पक्ष भाजपची 'सी टीम' आहे तर चंद्रशेखर राव हे पंतप्रधान मोदींच्या शिक्क्याप्रमाणे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.
 

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, परंतु यांची सगळी खेळी तेलंगणातील जनतेने ओळखली आहे. यांच्या नेहमीच्या वादग्रस्त आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या बोलण्यातून हे आता तेलंगणाच्या जनतेला वेडे बनवू शकत नसल्याचेही राहुल यांनी म्हटले आहे. तसेच, तेलंगणा राज्याची खूप मोठी स्वप्ने आहेत. परंतु, गेल्या चार वर्षात तेलंगणा राष्ट्र समिती आणि भाजपने मिळून ती स्वप्ने धुळीला मिळवली असल्याचे त्यांनी सांगतिले.

Web Title: PM Modi KCR Owaisi Are One Rahul Gandhi To People Of Telangana