पंतप्रधान मोदी नोव्हेंबरला केदारनाथ दौऱ्यावर

वृत्तसंस्था
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सहा नोव्हेंबरला केदारनाथच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वेळी पंतप्रधान मोदी तेथे प्रार्थना करणार असून, त्यानंतर केंद्रपुरी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करतील, असे आज अधिकृत सूत्रांनी सांगितले.

डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सहा नोव्हेंबरला केदारनाथच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या वेळी पंतप्रधान मोदी तेथे प्रार्थना करणार असून, त्यानंतर केंद्रपुरी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करतील, असे आज अधिकृत सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी सहा नोव्हेंबर रोजी सकाळी ज्योली घाट विमानतळावर पोचून त्यानंतर हेलिकॉप्टरने केदारनाथला जातील. मात्र या दौऱ्याची अद्याप अंतिम कार्यक्रम पत्रिका आलेली नाही. यापूर्वी पंतप्रधान नऊ नोव्हेंबरला मंदिरात जाणार होते. गेल्या वर्षी मोदी यांच्या हस्ते केंद्रपुरी प्रकल्पाचा शिलान्यास झाला होता.

Web Title: PM Modi on Kedarnath tour in November