esakal | प्रत्येक घरात नळ योजनेची मोदींच्या हस्ते सुरुवात 
sakal

बोलून बातमी शोधा

narendra-modi

गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याचा हक्क या योजनेमुळे लोकांना मिळणार आहे. प्रत्येक घरात पाणी पोहोचणार असल्याने माता-भगिनींचा त्रास कमी होईल, असे मोदी यांनी यावेळी सांगितले. 

प्रत्येक घरात नळ योजनेची मोदींच्या हस्ते सुरुवात 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जलजीवन मिशन अंतर्गत `प्रत्येक घरात नळ` या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज करण्यात आली. या योजनेमुळे पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्ह्यातील तीन हजार गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. ``हा भाग गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याचा हक्क या योजनेमुळे लोकांना मिळणार आहे. प्रत्येक घरात पाणी पोहोचणार असल्याने माता-भगिनींचा त्रास कमी होईल, `` असे मोदी यांनी यावेळी सांगितले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान म्हणाले... 
- आदिवासींना उत्पन्न मिळण्यासाठी देशभरात १२५० वन धन केंद्र सुरू 
- आदिवासी भागात शिक्षणासाठी आणखी एकलव्य शाळा सुरू करणार 
- शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न 
- सिंचनाच्या अपूर्ण योजना पूर्ण करण्यावर भर 
- घराघरांत पाणी पोहोचल्यामुळे आजारांचे प्रमाण कमी होईल व मुलांचे आरोग्यही सुधारेल