भाजपची लढाई 'स्कॅम'विरोधात - मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मेरठमध्ये येण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. मेरठच्या भूमीतून इंग्रजांविरुद्ध लढाई सुरु झाली होती. त्यावेळी इंग्रजांविरोधात लढाई होती, आता लढाई गरिबी, भ्रष्टाचार आणि भूमाफीयांविरोधात आहे.

मेरठ - उत्तर प्रदेशचा विकास करण्यासाठी 'एस' समाजवादी पक्ष, 'सी' काँग्रेस, 'ए' अखिलेश आणि 'एम' मायावती या स्कॅम'ला उखडून टाकल्याचे काम करावे लागणार आहे. या निवडणुकीत कमळ फुलवावे लागणार असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) पंतप्रधान मोदींची मेरठ येथे सभा झाली. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी झाली असून, भाजप आणि बहुजन समाज पक्षाला (बसप) कडवी लढत मिळणार आहे. मेरठमधील सभेत मोदींनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.

मोदी म्हणाले, की मेरठमध्ये येण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. मेरठच्या भूमीतून इंग्रजांविरुद्ध लढाई सुरु झाली होती. त्यावेळी इंग्रजांविरोधात लढाई होती, आता लढाई गरिबी, भ्रष्टाचार आणि भूमाफीयांविरोधात आहे. उत्तर प्रदेशजवळ देशातील सर्वांत शक्तीशाली राज्य बनण्याची संधी आहे. युवकांची संख्या येथे जास्त असताना, त्यांना राज्य सोडून नोकरीसाठी बाहेर जावे लागत आहे. मला अजून उत्तर प्रदेशचे कर्ज फेडायचे आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविलेला आहे. दिल्लीतील योजनांची अंमलबजावणी येथे करण्यासाठी सध्याचे सरकार हटविण्याची गरज आहे.

Web Title: pm modi in meerut bjps fight is against scam