पंतप्रधान मोदी स्वत:ची 'मन की बात' करतात : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या बलात्कार प्रकरणात भाजप आमदाराचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यावरही राहुल गांधींनी मोदींना टीकेचे लक्ष्य केले. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या बलात्कारात भाजपच्या आमदाराचा समावेश असल्याचे समोर आले. त्यावर मात्र पंतप्रधान मोदी एक शब्दही उच्चारत नाहीत. 

गौपीबिदानूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदी 'मन की बात' या त्यांच्या कार्यक्रमातून ते जनतेच्या नाहीतर स्वत:ची 'मन की बात' करत आहेत. देशातील जनतेचे काहीही ते ऐकत नाहीत. 

PM Modi mann ki baat

कर्नाटकच्या गौरीबिदानूर येथे झालेल्या रोड शोदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. ते  म्हणाले, पंतप्रधान फक्त स्वत: त्यांची 'मन की बात' करत आहेत. ते देशातील जनतेचे ऐकत नाहीत. पंतप्रधान मोदी हे त्यांच्या स्वत:ची मन की बात करत असून, देशातील जनतेला काय हवे आहे, याचा विचार करत नाही. 

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या बलात्कार प्रकरणात भाजप आमदाराचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यावरही राहुल गांधींनी मोदींना टीकेचे लक्ष्य केले. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या बलात्कारात भाजपच्या आमदाराचा समावेश असल्याचे समोर आले. त्यावर मात्र पंतप्रधान मोदी एक शब्दही उच्चारत नाहीत. 

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना हत्येप्रकरणातील आरोपी म्हणून राहुल गांधींनी नुकतेच संबोधित केले होते. त्यानंतर आता त्यांनी मोदींवर टीका केली. 

Web Title: PM Modi only says his Mann Ki Baat says Rahul Gandhi