मोदींना संसदेत भेटायला आलेला 'हा' खास पाहुणा आहे तरी कोण?

मोदींना संसदेत भेटायला आलेला 'हा' खास पाहुणा आहे तरी कोण?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटण्यासाठी एक खास मित्र थेट संसदेत आला होता. या खास मित्रासोबतचे फोटो मोदींनी आपल्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. मोदींचा हा खास मित्र दुसरा तिसरा कुणी नसून भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सत्यनारायण जटिया यांचा नातू आहे. मोदींनी आपल्या इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर त्या चिमुकल्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

संसदेत आज मला भेटण्यासाठी खास मित्र आला, असं कॅप्शन देत मोदींनी त्याच्यासोबत काढलेले फोटो शेअर केले आहेत. नरेंद्र मोदींच्या कुशीत असलेला चिमुकला नक्की कोण याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये नरेंद्र मोदी त्याच्यासोबत खेळत आहेत. मोदींनी त्याला चॉकलेट्सही दिल्याचं फोटोत दिसत आहे. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A very special friend came to meet me in Parliament today.

A post shared by Narendra Modi (@narendramodi) on

कामातून वेळ काढून मोदींनी या चिमुकल्यासोबत काही वेळ घालवला. मोदींनी यापूर्वीही परदेश दौऱ्यावर असताना लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com