'यापूर्वी दोन्ही देशांत असे संबंध नव्हते', जॉन्सन यांनी मानले मोदींचे आभार

PM Modi Received Boris Johnson
PM Modi Received Boris Johnsone sakal

नवी दिल्ली : भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson India Visit) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi-Boris Johnson Meeting) यांची आज दिल्लीत बैठक होत आहे. त्यासाठी आज पंतप्रधान मोदींनी जॉन्सन यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत केलं. याबाबत जॉन्सन यांनी मोदींचे आभार मानले. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये इतके चांगले संबंध कधीही नव्हते, असंही जॉन्सन म्हणाले.

PM Modi Received Boris Johnson
Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान थेट 'जेसीबी'वर स्वार

दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी जॉन्सन गुरुवारी गुजरातमध्ये दाखल झाले. ब्रिटीश उच्चायुक्तांनी दिलेल्या निवेदनानुसार, जॉन्सन या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मुक्त व्यापार करार (FTA) वाटाघाटींमध्ये प्रगती करण्यासाठी या भेटीचा उपयोग करतील. कारण भारतासोबत झालेल्या करारामुळे यूकेचा एकूण व्यापार दरवर्षी २८ अब्ज पौंडपर्यंत वाढेल असा विश्वास ब्रिटनकडून व्यक्त करण्यात आला.

बोरिस जॉन्सन गुरुवारी उशिरा दिल्लीत पोहोचले, जेथे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आज त्यांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक होत आहे. आज दोन्ही नेते महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदींसोबत बैठक होईल. मोदींनी केलेल्या स्वागताबद्दल जॉन्सन यांनी आभार मानले. तसेच यापूर्वी भारत आणि युकेमध्ये इतके चांगले संबंध होते, असं वाटत नाही, असंही ते म्हणाले. यूकेचे पंतप्रधान परराष्ट्र मंत्री (ईएएम) एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करतील . त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हैदराबाद हाऊस येथे जयशंकर माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत.

गेल्या वर्षी, जॉन्सन आणि पंतप्रधान मोदी यांनी यूके-भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवर सहमती दर्शवली. यूकेमध्ये 530 दशलक्ष पौंडहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली होती. तसेच व्यापार, आरोग्य, हवामान, संरक्षण आणि सुरक्षा यांमधील सखोल द्विपक्षीय संबंधांवर देखील चर्चा केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com