चव्हाणांची नोटाबंदीची शिफारस इंदिरांनी नाकारली- मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- "आपल्याला नोटाबंदी 1971 मध्येच करणे आवश्यक होते. तेव्हा हे न केल्यामुळे आपण मोठे नुकसान केले आहे. बेकायदेशीर व छुप्या संपत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नोटाबंदीची शिफारस केली होती," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे जोरदार समर्थन करीत संसदेचे कामकाज बंद पाडल्याबद्दल विरोधकांवर टीका केली. 
"पूर्वी विरोधक गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून कामकाज बंद पाडत होते. मात्र, आता विरोधक काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांविरोधात कामकाज बंद पाडत आहेत," असा आरोप त्यांनी केला.

यावेळी निवृत्त अधिकारी माधव गोडबोले यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत यशवंतराव चव्हाणांच्या शिफारशीचा दाखलाही पंतप्रधानांनी दिला. 
ते म्हणाले, "काँग्रेसला आणखी निवडणुका लढवायच्या नाहीत का, असा प्रश्न इंदिरा गांधी यांनी केला. त्यावरून चव्हाण यांना त्यातील संदेश मिळाला की त्यांची नोटाबंदीची शिफारस वगळण्यात आली आहे, असे गोडबोले यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे."

"ही 1971 मधील गोष्ट आहे. त्यावेळी सर्वांनी नोटाबंदीची शिफारस केली होती. 1971 मध्ये हे केले असते तर देशाची आज अशी स्थिती झाली नसती," असे मोदी म्हणाले. 
 
Web Title: PM Modi says Indira Gandhi denied note ban recommended by yb chavan