देशात रोजगाराची कमतरता नाही : पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

रोजगाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असते. आता त्याला उत्तर देताना मोदी यांनी देशात रोजगाराची कमी नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. देशात नोकऱ्यांची कमी नाही तर विरोधकांकडे आकडे कमी आहेत असे माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली - रोजगाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असते. आता त्याला उत्तर देताना मोदी यांनी देशात रोजगाराची कमी नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. देशात नोकऱ्यांची कमी नाही तर विरोधकांकडे आकडे कमी आहेत असे माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे, विमानसेवा, बांधकाम क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र अशा क्षेत्रात देशाने चांगली प्रगती केली असून, या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार क्षमता वाढली आहे. गेल्या वर्षात 70 लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या तयार झाल्या आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, एका आंतरराष्ट्रीय अहवालाचा दाखला देताना मोदींनी देशात गरीबी कमी झाल्याचे सांगितले. विरोधी पक्षाच्या आरोपाचे खंडन करताना मोदींनी पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमधील नोकऱय़ांच्या प्रमाणाचाही उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबत काँग्रेस पक्षावर टीका केली. त्यांनी सांगितले की, अर्थतज्ञ पंतप्रधान आणि अर्थतज्ञ अर्थमंत्री यांनी मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे. त्या तुलनेत आम्ही अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम करत आहोत असे मोदींनी स्पष्ट केले.

Web Title: PM Modi Says No Shortage Of Jobs In The Country Lack Of Data To Opposition