PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक; केंद्रानं मागवला सरकारकडून कारवाईचा अहवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Security Breach

सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत चौकशी समितीही स्थापन केली होती.

PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक; केंद्रानं मागवला सरकारकडून कारवाईचा अहवाल

PM Modi Security Breach : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेतील उल्लंघनाबाबत केंद्र सरकार (Central Government) कठोर झालंय.

केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब सरकारकडून (Punjab Government) याप्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवलाय. या संदर्भात केंद्रीय गृहसचिवांनी पंजाबच्या मुख्य सचिवांशी बोलून पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या सर्व अधिकार्‍यांवर आरोपपत्र दाखल करावं, असं सांगितलंय.

यानंतर या महिन्यात जबाबदार अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कारवाई होऊ शकते, असं मानलं जात आहे. गेल्या वर्षी 5 जानेवारीला पंजाबमधील फिरोजपूर (Punjab Ferozepur) येथील हुसैनीवाला उड्डाणपुलावर पंतप्रधान मोदींचा ताफा 15-20 मिनिटं अडकला होता.

पंतप्रधान फिरोजपूर इथं रॅलीसाठी जात होते, तिथं ते निवडणुकीच्या दृष्टीनं 42,000 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार होते. मात्र, त्यांची सभा पुढं ढकलावी लागली. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत सरकारी माध्यम संस्थेनं पीआयबीनं माहिती दिली की, 'पंतप्रधानांचा ताफा राष्ट्रीय हुतात्मा स्मारकापासून 30 किमी अंतरावर असलेल्या हुसैनीवाला येथून जात होता, तिथं काही आंदोलकांनी उड्डाणपुलावर निदर्शनं करत मोदींचा ताफा रोखला.'

सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत चौकशी समितीही स्थापन केली होती. या संपूर्ण प्रकरणासाठी फिरोजपूरच्या एसएसपीला जबाबदार धरलं होतं. पुरेसा फौजफाटा असूनही फिरोजपूर एसएसपी आपलं कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याचं एससी पॅनेलनं म्हटलं होतं.