मोदीजी.. 'ना खरीदुंगा.. ना खरीदने दुंगा' असं म्हणा! : काँग्रेस

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेमध्ये भाजपची बहुमत चाचणीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात रंगलेल्या आणखी एका न्यायालयीन लढ्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल यांनी आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 'कर्नाटकमधील संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता पंतप्रधान मोदी यांनी 'ना खरीदुंगा, ना खरीदने दुंगा' असे म्हणायला हवे', अशी तिरकस प्रतिक्रिया व्यक्त केली. 

कर्नाटकमधील बहुमत चाचणीच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशावर सिब्बल यांनी समाधान व्यक्त केले. कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपच्या के. जी. बोपय्या यांची नियुक्ती झाली होती. त्या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. 

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सिब्बल म्हणाले, "पंतप्रधान मोदी नेहमीच म्हणत असतात.. 'ना खाऊंगा.. ना खाने दुंगा'! आता कर्नाटकमध्ये जे काही सुरू आहे, त्यावरून 'ना खरीदुंगा.. ना खरीदने दुंगा' असेच पंतप्रधान मोदी यांनी म्हणायला हवे.''

Web Title: PM Modi should say na kharidunga na khardine dunga, says Kapil Sibal