मोदींमध्ये स्वत:ला सामोरे जाण्याची हिंमत नाही: काँग्रेस

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसने नोटाबंदीनंतर मोदींमध्ये स्वत:लाही सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने ते देशाला धमकावत असल्याची टीका केली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसने नोटाबंदीनंतर मोदींमध्ये स्वत:लाही सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने ते देशाला धमकावत असल्याची टीका केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी म्हणाले, "तुम्ही आजपर्यंत देशला धमकावणारा एवढा आक्रमक पंतप्रधान पाहिला होता का? गरीबांच्या खात्यात जमा करण्यात आलेले पैसे श्रीमंतांना दिले जाणार नाहीत, अशी भाषा पंतप्रधान वापरत आहेत. त्यांना असे वाटते का की, प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने गरीबांचे खाते भाड्याने घेतले आहे? पंतप्रधान एक विसरत आहेत की येथे काही असे पक्ष आहेत की जे जाती-धर्माच्या नावावर आणि आता गरीब-श्रीमंतांच्या नावावर देशात फूट पाडत आहेत. ते गेल्या पन्नास दिवसांपासून विचित्रपणे बोलत आहेत. ते दुसऱ्यांमध्ये दोष शोधत आहेत. मात्र आरश्‍याकडे पाहून स्वत:ला सामोरे जाण्याची त्यांची हिंमत नाही.'

मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील परिवर्तन रॅलीमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी भारताचे भाग्य बदलण्यासाठी पहिली अट अहे की आपल्याला प्रथम उत्तर प्रदेशचे भाग्य बदलावे लागेल. सर्व जाती धर्म विसरून उत्तर प्रदेशच्या विकासासाठी मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: PM Modi is threatening the country : Congress