मोदींनी आचारसंहितेचा भंग केला : समाजवादी पक्ष

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) वाराणसी येथे आयोजित केलेल्या "रोड शो'वर विरोधकांनी निशाणा साधला आहे. मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना समाजवादी पक्षाचे नेते राजेंद्र चौधरी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठापासून काशी विश्‍वनाथ मंदिरापर्यंत आयोजित केलेल्या "रोड शो'मुळे खुलेआमपणे आचारसंहितेचा भंग झाला आहे. भाजप मर्यादांचे पालन करू इच्छित नाही. भाजपकडून घटनात्मक हक्कांचा दुरुपयोग करण्यात येत आहे.'

मोदी यांनी आज त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे "रोड शो' केला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. "हर हर मोदी, घर घर मोदी' देत उपस्थितांनी मोदी यांच्या "रोड शो'चे उत्स्फूर्त स्वागत केले. समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज मोदींच्या मतदारसंघात "रोड शो' केला. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.

Web Title: PM Modi violated Code of Conduct : SP