पंतप्रधान मोदींकडून 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची हवाई पाहणी (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची हवाई पाहणी केली. त्यांनी याचा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे.

एका हेलिकॉप्टरवरून चित्रित केलेला व्हिडिओ मोदींनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले, की मी नुकतीच केवाडिया येथे भेट दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या चारही बाजूंनी चित्रण केले जात आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आज आपल्या आईची भेटही घेतली. त्यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या आईचे आशीर्वादही घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi Visited Statue of Unity