esakal | नरेंद्र मोदींच्या हस्ते 'पीएम गति शक्ती' मास्टर प्लॅनचे अनावरण
sakal

बोलून बातमी शोधा

 modi

नरेंद्र मोदींच्या हस्ते 'पीएम गति शक्ती' मास्टर प्लॅनचे अनावरण

sakal_logo
By
ओमकार वाबळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ऑक्टोबर रोजी मेगा पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचे अनावरण करणार आहेत. याद्वारे प्रशासनातील महत्वाचे अधिकारी आजवर झालेल्या परिवर्तनाबद्दल माहिती देतील. यामुळे केंद्र सरकारचे विविध १६ विभाग एकत्र येऊन 2025 पर्यंत उभारल्या जाणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नियोजनासाठी आराखडा तयार करतील. या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. प्रधानमंत्री गती शक्ती योजनेचे एकूण बजेट 100 लाख कोटी निश्चित करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत 2025 पर्यंत सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांची योजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या 16 विभागांना एकत्र आणले जाईल. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अॅप्लिकेशन्स आणि जिओ-इन्फॉर्मेटिक्सने मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन तयार केला आहे. ज्यामध्ये देशभरात जीआयएस मॅपिंगचे 200 स्तर आहेत.

सर्व पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या समग्र नियोजनासाठी सामील होण्यास राज्य सरकारांशी संपर्क साधला जात आहे. योजनेमध्ये 2020-21 पर्यंत बांधलेल्या सर्व प्रकल्पांचा तपशील आहेत. आणि वर्ष 2025 पर्यंत ठरवण्यात आलेल्या 16 विभागांच्या सर्व केंद्रीय प्रकल्पांची माहिती यामध्ये आहे. यासंदर्भात न्यूज १८ ने वृत्त दिले आहे.

या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पीएम गतिशक्ती - राष्ट्रीय मास्टर प्लॅन' जाहीर केला होता. रेल्वे, रस्ते आणि महामार्ग, पेट्रोलियम आणि वायू, वीज, दूरसंचार, जहाजबांधणी, उड्डाण मंत्रालय आणि उपभोक्ता विभाग यांसारख्या 16 केंद्रीय शासकीय विभागांना एका व्यासपीठावर आणण्याचं काम यामुळे होणार आहे. नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या अंतर्गत हे सर्व विभाग एकमेकांच्या कामांमध्ये सहकार्य पुरवतील. त्यामुळे समग्र नियोजन साध्य करता येईल.

loading image
go to top