राहुल यांना मोदी, मुफ्ती यांनी दिल्या शुभेच्छा 

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आज वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, पीडिपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आज वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, पीडिपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी यांचा आज 48 वा वाढदिवस होय. मोदी यांनी ट्विट करताना म्हटले की, राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. राहुल यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना आपण करतो.

मेहबूबा मुफ्ती यांनीही राहुल यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसच्या वतीने देशभरात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

Web Title: PM Modi wishes Rahul Gandhi on his 48th birthday