मोदींचे 'मन की बात'द्वारे जनतेला वारी अनुभवण्याचे आवाहन

वृत्तसंस्था
रविवार, 29 जुलै 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.29) आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेसोबत संवाद साधला. त्यामध्ये, आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून देशातील जनतेला 'एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्या,' असं आवाहन केलं आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.29) आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेसोबत संवाद साधला. त्यामध्ये, आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून देशातील जनतेला 'एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्या,' असं आवाहन केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून अतिवृष्टीसह देशातील विविध समस्यांवर बोलताना पंढरपूरच्या वारीचं महत्त्वही पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 'महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये आषाढात वारी निघते. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सामील होतात. शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम म्हणजे ही वारी असते. पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात जाणं याच्यासारखा दुसरा अध्यात्मिक आनंद नाही. त्यामुळे, आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारीचा अनुभव घ्यायलाच हवा,' असे त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर, त्यांनी लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना अभिवादन केलं. तर प्रसिद्ध कवी नीरज यांना श्रद्धांजली वाहिली. 'आशा, विश्वास, दृढसंकल्प यांचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कवी नीरज होते,' अशा शब्दांत त्यांनी नीरज यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, पावसाळ्यात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून स्वत:चं संरक्षण करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. सुवर्णकन्या हिमा दासचेही मोदींनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून कौतुक केले आहे.

दरम्यान, मन की बात या कार्यक्रमाचा आजचा 46 वा भाग होता. दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाद्वारे देशातीला जनतेला संबोधित करत असतात.

Web Title: PM Modis Mann Ki Baat