'2019 ला मोदीच जिंकणार ही 'गॅरंटी''

PM Modis Win In 2019 Guaranteed Says BJP At Key Meet
PM Modis Win In 2019 Guaranteed Says BJP At Key Meet

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुका या भारतीय जनता पक्षच जिंकणार आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार असा निर्धार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागलेल्या भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा साधला. विरोधकांकडे नेता नाही, निती नाही आणि रणनीतीही नाही अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. हैराण झालेल्या विरोधी पक्षाकडून नकारात्मक राजकारण सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपाच्या दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव कार्यकारणीनं एकमतानं मंजूर केला. या प्रस्तावात व्हिजन 2022 सादर करण्यात आले. या व्हिजनमध्ये 2022 ला ना कोणी गरीब असेल ना कोणी बेघर असेल असे सांगण्यात आले आहे.
 
त्याचबरोबर, देशात नवनिर्मितीचं वातावरण आहे. देशातील जनता स्वत:ची प्रगती करत देशाच्या विकासात मोठा वाटा उचलत आहे असेही केद्रीय मंत्री जावडेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले की, मोदी हे आजच्या घडीला जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. चार वर्षे सत्तेत राहूनही त्यांची लोकप्रियता कायम आहे. त्यांच्या काही धोरणांमुळे देशात व्यवसाय वाढीस लागला आहे. देशातील व्यापारी खूश असून गुंतुवणुकीला ते प्राधान्य देत असल्याचे त्यांनी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com