मोदी यांचा नवा "लुक' व्हायरल

वृत्तसंस्था
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेहरावाबाबत अनेकदा चर्चा होते. खादीच्या कपड्यांना साजेसे जॅकेट ते नेहमी घालतात. हेच जॅकेट "मोदी जॅकेट' म्हणून लोकप्रिय झाले आहे. परदेश दौऱ्यातील त्यांच्या सूटनेही सर्वांचे लक्ष वेधले. मात्र अंदमान दौऱ्यात त्यांचा वेगळाच "लुक' दिसला.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेहरावाबाबत अनेकदा चर्चा होते. खादीच्या कपड्यांना साजेसे जॅकेट ते नेहमी घालतात. हेच जॅकेट "मोदी जॅकेट' म्हणून लोकप्रिय झाले आहे. परदेश दौऱ्यातील त्यांच्या सूटनेही सर्वांचे लक्ष वेधले. मात्र अंदमान दौऱ्यात त्यांचा वेगळाच "लुक' दिसला.
 

नव्या पेहरावातील छायाचित्र त्यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून, त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. मोदी यांनी परंपरागत वेश परिधान केलेला छायाचित्रात दिसत आहे. त्यांनी हलक्‍या निळ्या रंगातील झब्बा व पांढऱ्या रंगातील लुंगी असा पेहराव केलेला छायाचित्रात दिसत आहेत. केरळ व कर्नाटकमध्ये याला "मुंडू' असे म्हटले जाते. या छायाचित्राखाली मोदी यांनी "निसर्गरम्य पोर्टब्लेअरमधील सकाळ... सूर्योदय व परंपरागत वेशभूषा', अशी ओळही लिहिली आहे. मोदी यांचा हा "लुक' व्हायरल झाल्यानंतर त्याला दहा लाख लाइक्‍स मिळाले आहेत.

 

Web Title: PM Narendra Modi’s new look goes viral on Instagram