Article 370 मुळे घराणेशाही फोफावली : पंतप्रधान

टीम ई-सकाळ
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

जम्मू काश्मीरमधील लोक आता विकासापासून दूर राहू शकत नाहीत. जम्मू काश्मीरच्या विकासात कलम 370 हा अडसर होता, तो आता दूर झाला आहे. या कलमामुळे काश्मीरमध्ये घराणेशाही फोफावली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील लोक आता विकासापासून दूर राहू शकत नाहीत. जम्मू काश्मीरच्या विकासात कलम 370 हा अडसर होता, तो आता दूर झाला आहे. या कलमामुळे काश्मीरमध्ये घराणेशाही फोफावली होती, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

जम्मू-काश्‍मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा का काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरातील नागरिकांची समस्या आता दूर झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह काही नेत्यांचे हे स्वप्न होते. मात्र, आम्ही ते आता पूर्ण केले आहे. 

आता देशातील सर्व नागरिकांचे हक्क समान आहे. 370 मुळे जम्मू-काश्मीरातील लोकांना काय फायदा झाला याबाबत सांगता येत नव्हते. भ्रष्टाचाराशिवाय या कायद्याने काहीही दिले नाही, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Addresses Nation on Issue of Article 370