प्रत्येक नागरिकाकडे असेल स्वत:चे घर - मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नागरिकांना होणाऱ्या त्रासाची मला जाणीव असून, त्यांनी मला दिलेल्या 50 दिवसांनंतर सर्व काही सुरळीत होईल असेही मोदींनी नमुद केले.

आग्रा - पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पतंप्रधान आवास योजने'चे आज (रविवार) उद्धाटन केले. त्यावेळी एका रॅलीमध्ये बोलताना मोंदींनी 2022 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाकडे स्वत:चे घर असेल असे आश्वासन नागरिकांना  दिले. तसेच, कानपूर दूर्घटनेबद्दल दू:ख व्यक्त करत, या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  

देशातील काळ्या पैशांविषयीची सफाई करताना मला नागरिकांची मोठी मदत मिळत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या परिस्थितून आपण लवकर बाहेर पडू तसेच, आपले हे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे ते यावेळी बोलताना म्हणाले. 

नागरिकांना होणाऱ्या त्रासाची मला जाणीव असून, त्यांनी मला दिलेल्या 50 दिवसांनंतर सर्व काही सुरळीत होईल असेही मोदींनी नमुद केले. यावेळी बोलताना, चीटफंडात कोणा कोणाचे पैसे अडकले आहेत हे जनतेला चांगले माहित आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांवरही निषाणा साधला. 

Web Title: PM Narendra Modi Addresses A Public Gathering In Agra