ModiWithAkshay : आपले मिम्स पाहून मोदींना हसू अनावर झाले...

modi
modi

नवी दिल्ली : अभिनेता अक्षय कुमार याने काल (ता. 24) पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अक्षयने तुमच्यावर व्हायरल होणाऱ्या मिम्सबद्दल विचारले. यावेळी मोदी म्हणाले, 'मी या मिम्सची पुरेपुर मजा घेतो. त्यात मी मला कमी आणि त्यातील कल्पकतेला जास्त प्राधान्य देतो.'

अक्षयने यावेळी मोदींना काही मिम्स दाखवली, त्यावेळी त्यांना हसू आवरले नाही. मोदी म्हणाले की, 'मिम्स तयार करणाऱ्यांची बुद्धी कल्पक आणि नावीन्यपूर्ण असते, ते उपरोधिकपणे आपला मुद्दा मांडू शकतात.'

पंतप्रधान नरेंद्र मोदींची अक्षय कुमारने मुलाखत घेतली, ही मुलाखत पूर्णपणे अराजकीय होती. यात मोदींनी बालपणीपासून ते पंतप्रधानपदापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. मोदी हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात, त्यामुळे त्यांना ट्रोल करण्याचे व त्यांचे मिम्स बनविण्याचे प्रमाण ही जास्त आहे.       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com