Ayodhya Verdict : अयोध्येचा निकाल म्हणजे एकता अन् शांतीचे प्रतीक! : मोदी

टीम ईसकाळ
Saturday, 9 November 2019

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत या निकालाचे स्वागत केले आहे. 

नवी दिल्ली : बहुचर्चित अयोध्या राम मंदिर प्रकरणाचा निकाल आज (ता. 9) लागला. वादग्रस्त 2.77 जागेचा निकाल रामलल्लाच्या बाजूने लागला. तर 5 एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यात आली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत या निकालाचे स्वागत केले आहे. 

Ayodhya Verdict : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा 

मोदींनी ट्विटमध्ये म्हणले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. या निर्णयात कोणाची हार-जीत बघू नका. रामभक्ती असो किंवा रहिमभक्ती ही वेळी भारतभक्ती मजबूत करण्याची आहे. देशवासियांना मी शांती व सद्भाव प्रस्थापित करण्यास सांगतो. सर्व पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला. न्यायव्यवस्थेने सौहार्दपूर्ण निर्णय देऊन समाधान केले आहे. असे ट्विट मोदींनी केले आहे. 

 

 

'श्रीराम मंदीर जन्मभूमीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे मी स्वागत करतो. सर्व समाजाने व सर्व धर्मियांनी या निर्णय स्वीकारावा आणि एक भारत-श्रेष्ठ भारत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कटीबद्ध व्हावे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे.'

बाबरी मशिदीच्या जागेत मंदिराचे अवशेष : सुप्रिम कोर्ट

गेली कित्येक वर्षे सुरु असलेल्या या विवादावर अखेर आज अंतीम तोडगा निघाला आहे. मी भारताची न्याययंत्रणा व सर्व न्यायमूर्तींचे अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी या विवाद सोडविण्यासाठी गेली अनेक वर्षे कष्ट घेतले त्या संस्था, संत समाज व लाखो अज्ञात व्यक्तींबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक ठरेल व तो भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातला मैलाचा दगड बनेल, याचा मला विश्वास आहे. या निर्णयामुळे भारताची एकता, अखंडता आणि महान संस्कृतीला नवे बळ प्राप्त होईल," असेही अमित शहा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi and Home Minister Amit Shah tweets on Ayodhya Verdict